Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच
CMS Admin | Jul 11, 2025, 16:28 IST
बजाजने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच बजाज कंपनीने Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट मार्केटमध्ये लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास Maruti Grand Vitara चा किती असेल EMI?भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यातही काळानुसार ग्राहकांच्या मागणीत बदल दिसून येत आहे. पूर्वी, बाईक खरेदी करताना अनेक जण फक्त त्याच्या मायलेजकडे लक्ष देत असत. मात्र, आज ही स्थिती बदलताना दिसत आहे. आजचा ग्राहक आपल्या बाईकमध्ये आकर्षक लूक सुद्धा पाहत असतो. अशातच आता बजाजने त्यांच्या दमदार बाईकचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.
बजाज ऑटो त्यांच्या लोकप्रिय Bajaj Pulsar N160 लाइनअपचा विस्तार करण्यावर काम करत आहे. कंपनीने आता त्याचा एक नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये सिंगल-सीट आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखी फीचर्स आहेत, ज्याची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. त्यात इतर अनेक उत्तम फीचर्ससह अपडेट केले गेले आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास Maruti Grand Vitara चा किती असेल EMI?
Pulsar N160 चा व्हेरिएंटनुसार किंमत
या बाईकचे चार वेगवेगळे व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत, आणि प्रत्येक व्हेरिएंटच्या फीचर्सनुसार किंमत ठरवण्यात आली आहे. बेसिक सिंगल सीट मॉडेलची किंमत 1,22,720 रुपये आहे. यानंतर सिंगल सीट ड्युअल चॅनेल एबीएस** (नवीन मॉडेल) व्हेरिएंटची किंमत 1,25,722 रुपये इतकी आहे. थोडी अधिक आरामदायक आणि स्पोर्टी लूक देणारी स्प्लिट सीट व्हेरिएंटची किंमत 1,26,669 रुपये आहे. टॉप व्हेरिएंट इनव्हर्टेड फोर्क ची किंमत 1,36,992 रुपये ठेवण्यात आली आहे.
डिझाइन
या नवीन व्हेरिएंटचे डिझाइन स्टॅंडर्ड बजाज पल्सर N160 सारखेच ठेवण्यात आले आहे. यात स्प्लिट-सीट सेटअपऐवजी सिंगल-पीस सीट आहे. सिंगल-पीस सीट देण्यामागील उद्देश म्हणजे बाईक पिलियन रायडरसाठी थोडी अधिक आरामदायी बनवणे. याशिवाय, स्प्लिट रीअर ग्रॅब रेल देखील सिंगल-पीस युनिटने बदलण्यात आली आहे.
अख्खं मार्केट आता आपलंय ! Tata च्या ‘या’ कारने June 2025 मध्ये सर्वच ऑटो ब्रँड्सना दिली धोबीपछाड<br>
सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टम
नवीन बजाज पल्सर N160 मध्ये 37 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशनसह ड्युअल-चॅनेल ABS आहे, जे एंट्री-लेव्हल व्हर्जनपेक्षा खूपच चांगले बनवते. बेस-स्पेसिफिकेशनच्या 230 मिमीच्या तुलनेत यात 300 मिमी फ्रंट डिस्क आहे आणि आता 280 मिमी रिअर डिस्क ब्रेक आहे. 17-इंच अलॉय व्हील्समध्ये ट्यूबलेस टायर्स आहेत, जे 100-सेक्शन फ्रंट आणि 130-सेक्शन रिअर आहेत. याचा ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी, सीटची उंची 795 मिमी, फ्युएल टॅंक 14-लिटर आणि कर्ब वजन 154 किलो आहे.
Pulsar N160 इंजिन
या बाईकमध्ये 164.82 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 16 पीएस पॉवर आणि 14.65 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.