Indigo Flight: विमानानं उड्डाण केलं अन्...; Indore च्या हवाई क्षेत्रात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांचा जीव

CMS Admin | Jul 08, 2025, 17:34 IST
Indigo Flight: विमानानं उड्डाण केलं अन्...; Indore च्या हवाई क्षेत्रात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांचा जीव
इंदोरमध्ये इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंदोरमधून रायपूरला जाणाऱ्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
इंदोर: इंदोरमध्ये इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंदोरमधून रायपूरला जाणाऱ्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सूरत जयपूर फ्लाइटचे देखील इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगच्या घटना वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

इंदोरवरून रायपूरकडे उड्डाण केलेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान इंडिगो एअरलाइन्सचे होते. काही तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाने उइदडण घेतल्यानंतर केवळ अर्ध्या तासात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

विमानाने उड्डाण केल्यावर अर्ध्या तासाने विमानात एक झटका बसल्याचे जाणवले. त्यानंतर पायलटने काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमान इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात येत असल्याचे सांगितले. काही काळासाठी विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

पुण्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडीगोच्या विमानात ( ६ई- ६४८३) तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विजयवाडा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. यावेळी विमानात १८० प्रवासी व क्रु मेंबर होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी बोलून हा निर्णय घेतला.

पुणे विमानतळावरून रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी इंडिगोच्या विमानाचे उड्डाण झाले. सकाळी १० वाजता हैदराबादला हे विमान पोचणे अपेक्षित होते. मात्र विजयवाडाच्या हवाई क्षेत्रात आल्यानंतर अचानक विमानात तांत्रिक दोष निर्माण झाला. परिणामी विमानाला हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विजयवाडा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सकाळी पावणे दहाच्या सुमारास विमान सुखरूपपणे उतरले.

Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

इंडिगोचे स्पष्टीकरण

“फ्लाइट ६ई ६४८३ मध्ये तांत्रिक बिघाडाचे निदान झाल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून वैमानिकाने विजयवाडा येथे सुरक्षितपणे लँडिंग केले. आमची तांत्रिक आणि ग्राउंड टीम प्रवाशांना सर्व सुविधा देत असून, त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.”

भुवनेश्वरहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-1097) विमानाच्या लँडिंगच्या अंतिम टप्प्यात शनिवारी सायंकाळी थरारक प्रसंग घडला. सायंकाळी सहाच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, धावपट्टीवर अचानक कुत्रा दिसल्याने वैमानिकाने लँडिंग रद्द करण्याचा तात्काळ निर्णय घेतला.त्यावेळी विमान अंदाजे ५० ते १०० फूट उंचीवर होते. वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजगतेने निर्णय घेत पुन्हा हवेत भरारी घेतली, ज्यामुळे मोठा अपघात टळला.

Tags:
  • indigo flight emergency landing
  • plane emergency landing in indore
  • indore flight
  • indigo airbus
  • big news
  • breaking news
  • latest news
  • indigo flight nagpur emergency landing

Follow us
    Contact