संजय गायकवाडांची कॅन्टीन चालकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
Jul 09, 2025, 12:57 IST
Sanjay Gaikwad canteen operator beaten : आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्यामुळे आकाशवाणी कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे.
शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली आहे. संजय गायकवाड हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता गायकवाड यांनी मारहाण केली असून याचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या आमदार निवासमध्ये शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी बनियनवर बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये वाद निर्माण झाला आहे.
राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेणार का? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी स्पष्टच सांगितलं
कॅन्टीन चालकाला कानाखाली लगावली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल (दि.08) रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. याचबरोबर त्यांनी आमदार निवास मधील व्यवस्थापनाला देखील जाब विचारला आहे.
Pune Market Scam News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा; पणन संचालकांचे चौकशीचे आदेश
पूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार
मीडिया रिपोर्टनुसार, आकाशवाणी मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला. कॅन्टीन चालकांला त्यांनी वास देखील घ्यायला लावलाया पूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड सांगितलंतसेच कोणीही जेवणाचं बील देऊ नये , मी विधीमंडळाच्या सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचे देखील संजय गायकवाड म्हणाले आहेत.